‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ Ajit Pawar महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करणार ‘शक्ती अभियान’

119
Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा
Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा

राज्यात वाढती गुन्हेगारी म्हणजेच अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार, लैंगिक अत्याचार, छेडछाड प्रकरण या सगळ्यांवर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवार (०३ सप्टेंबर) ते बारामतीत पत्रकार परिषदेत (Ajit Pawar Press Conference) बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात तथा बारामतीत जशा घटना घडतायत अशा घटना घडायला नको, याची काळजी घेण्यासाठी काही पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे. गुरुवारी सकाळी बारामतीमधल्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बैठक झाली. या बैठकीत महिला सुरक्षेसाठी (women safety) शहरात ‘शक्ती अभियान’ (Shakti Abhiyan) राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Ajit Pawar)

पत्रकार परिषदमध्ये अजित पवार म्हणाले की, बारामती शहरातील २ अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची दखल घेत, शहराला काळीमा फासणारी ही घटना दुर्दैवी आहे. अलीकडच्या काळात जन्माला आलेली मुले इतके स्मार्ट आहेत, मुलं अनेक नवं नवीन प्रश्न विचारतात. अल्पवयीन मुलांच्या वयाची मर्यादा १४ पासून करता येईल का याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल. मी दिल्लीला गेल्यानंतर नक्की याविषयी बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांचीही चर्चा करणार आहे. अलीकडच्या काळात अल्पवयीन मुले गुन्ह्यात अडकत आहे. त्याविषयी निर्णय करण्याचा विचार आम्ही करू असं अजित पवारांनी सांगितले. यावेळी अजित पवारांनी बारामती शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पंचशक्ती अभियानाची घोषणा केली. नेमकं कसं असेल हे अभियान जाणून घेऊया.

(हेही वाचा – Anurag Thakur म्हणाले- काँग्रेसची आश्वासने खोटी; ते दंगलखोर-खंडणीखोरांच्या भरोवशावर) 

शक्ती बॉक्स तक्रार पेटी 

मुलींचा पाठलाग करणे, त्यांना मेसेज पाठवणे, कधीकधी दुसऱ्यांच्या फोनवरून संपर्क साधणे, मनमोकळेपणाने मुलींना या गोष्टी सांगता येत नाही. ज्या मुली तक्रार करण्यासाठी घाबरतात त्यांच्यासाठी शहरातील सर्व परिसरात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, एसटी स्टँड, पोस्ट ऑफिस, महिला वसतीगृह इथं ‘शक्ती बॉक्स’ तक्रार पेटी लावण्यात येईल. या तक्रार पेटीत गोपनीय तक्रारीही देता येईल, २-३ दिवसांत हा बॉक्स उघडून त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्याची दक्षता घेतली जाईल. शहरातील कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे.  (Ajit Pawar)

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमधील उखरुलमध्ये पुन्हा हिंसाचार ; एक जवान हुतात्मा)

शक्ती हेल्पलाईन – एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह – 9209394917 

बारामती शहरातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा ठेवण्यासाठी ही कॉल सेवा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. शाळा, कॉलेज, सरकारी, खासगी संस्था, कंपनी, हॉस्पिटल येथे दर्शनी भागात हे नंबर लावले जातील. अवैध धंदे, महिला छेडछाड याबाबत तक्रार आणि लोकेशन शेअर करून पोलिसांकडून कारवाई केली जाईल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.