मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. तसेच भाजप प्रवेशावरही त्यांनी वक्तव्य केले आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना भाजप प्रवेशाबाबत ही वक्तव्य केलं. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (Eknath Khadse)
मी भाजपमध्ये येणार
एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, “भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होईल. म्हणून मी त्याबाबतीत निश्चिंत आहे. मी भाजपमध्ये येणार या मुद्द्यावर काही लोकांची नाराजी होतीच. एवढे वर्ष सोबत काम केले होते. म्हणून सर्व गुणगान करतील असे होत नाही. काही लोक दुखावले जातात, त्यांच्या नाराजीचा परिणाम अशा गोष्टींवर होत असतो. जे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मी करत आहे.” (Eknath Khadse)
मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही
“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी अजून पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार (Sharad Pawar) यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही. काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या.” असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. (Eknath Khadse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community