भाजपामध्ये घरवापसी होताच Eknath Khadse यांना मोठी जबाबदारी दिली जाणार ?

191
भाजपमध्ये घरवापसी होताच Eknath Khadse यांना मोठी जबाबदारी दिली जाणार ?
भाजपमध्ये घरवापसी होताच Eknath Khadse यांना मोठी जबाबदारी दिली जाणार ?

भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर दिल्लीत बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली असून या बैठकीत लोकसभेतील अपयशावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी मोठी बातमी समोर आली असून माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपामध्ये घरवापसी होताच खडसेंना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा –“उबाठा गट म्हणजे विधायक कामाला नाट लावणारे…”, Chitra Wagh यांचा हल्लाबोल!)

आता राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुका होण्याआधीच एकनाथ खडसेंनी घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यांच्या भाजपा प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. (Eknath Khadse)

(हेही वाचा –CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘त्या’ कृतीमुळे अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य! पहा व्हिडीओ)

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार होते. पण रक्षा खडसे निवडून येतील तेव्हाच त्यांना प्रवेश दिला जाईल, असंही म्हटलं जात होतं. आता रक्षा खडसे यांचा विजय झाल्याने एकनाथ खडसेंना भाजपात प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सुचक विधान केलं आहे. अद्याप खडसेंचा भाजपात प्रवेश झालेला नाही. ज्यावेळी ते भाजपामध्ये येतील त्यावेळी पाहू असं बावनकुळे म्हणाले आहेत. (Eknath Khadse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.