तीन महिने उलटूनही भाजपा प्रवेश न झाल्याने Eknath Khadse द्विधा मनस्थितीत?

195
तीन महिने उलटूनही भाजपा प्रवेश न झाल्याने Eknath Khadse द्विधा मनस्थितीत?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून बाहेर पडल्यानंतर १५ दिवसात आपण भाजपामध्ये प्रवेश करू, असे जाहीर करूनही एकनाथ खडसे गेली तीन महिने पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या रखडलेल्या पक्षप्रवेशामागे राज्यातील भाजपा नेते असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे तर आता खडसे भाजपामध्ये प्रवेश करण्यावरही द्विधा मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे. (Eknath Khadse)

फडणवीस जबाबदार

गेली चार दशके भाजपामध्ये सक्रिय असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आणि २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. २०२० मध्ये खडसे यांनी फडणवीस यांना जबाबदार धरत भाजपाचा त्याग केला आणि एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Eknath Khadse)

(हेही वाचा – Heavy Rain : पंपिंग स्टेशनची व्यवस्था, तरीही तुंबले मिलन, अंधेरी, हिंदमाता आणि गांधी मार्केटच्या परिसरात पाणी)

पक्ष सोडल्याची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वर्षभरातच फूट पडली आणि अजित पवार गट वेगळा झाला. त्यानंतर खडसे यांनी शरद पवार यांना साथ देत त्यांच्यासोबत राहिले. दरम्यान, लोकसभा निवडणूक लागली आणि निवडणुकीआधीच खडसे यांनी एप्रिल २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्ष सोडल्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी १५ दिवसांत आपण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचेही जाहीर करून टाकले. (Eknath Khadse)

तीन महिने उलटूनही प्रवेश नाही

राज्यातील नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता खडसे यांनी थेट दिल्लीतील भाजपा नेत्यांशी संपर्क करत पक्ष प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. मात्र तीन महिने झाल्यानंतरही खडसे यांचा भाजपामध्ये अधिकृत प्रवेश झाला नसल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत. (Eknath Khadse)

राष्ट्रवादीला चांगले दिवस

लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर खडसे ज्या पक्षात होते त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले दिवस आले आणि १० पैकी ८ उमेदवार निवडून आले. खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतरही यांच्या कन्या रोहिणी यांनी शरद पवार यांच्याच पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता खडसे द्विधा मनस्थितीत असून पुन्हा राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे बोलले जात आहे. (Eknath Khadse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.