Eknath Khadse यांनी रक्षा खडसेंसह घेतली अमित शहा यांची भेट, मोठी जबाबदारी मिळणार? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

आता या भेटीनंतर खडसे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला असल्याचे मानले जात आहे.

180
Eknath Khadse यांनी रक्षा खडसेंसह घेतली अमित शहा यांची भेट, मोठी जबाबदारी मिळणार? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुरुवारी, (२० जून) रात्री भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसे यांचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः त्यांच्या खांद्यावर भाजपा एखादी मोठी जबाबदारी देईल, अशी चर्चाही या प्रकरणी राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपामध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यानंतर आता या भेटीनंतर खडसे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला असल्याचे मानले जात आहे.

(हेही वाचा – T20 World Cup, Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाचीही सुपर ८ मध्ये विजयाने सुरुवात, बांगलादेशवर २८  धावांनी विजय)

राजकीय चर्चांना उधाण
अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्यात या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पण याविषयी वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपामध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती तसेच आपला प्रवेश राज्यात नव्हे तर दिल्लीत होणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी रक्षा खडसे यांच्या विजयासाठी चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून झालेल्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. आता खडसे यांचा पुन्हा भाजपात प्रवेश कधी होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपाकडून विधानसभेची तयारी सुरू
लोकसभेच्या पराभवानंतर भाजपा विधानसभेच्या तयारीला लागली आहे. याप्रकरणी भाजपामध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाने नुकतेच महाराष्ट्र भाजपा ही कोणत्याही एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणार नसल्याचे स्पष्ट केले होते. भाजपाची ही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटणारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी अमित शहांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या खांद्यावर भाजपा संघटनेची एखादी मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.