Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; फोनवरून बोलतांना खडसे झाले भावूक

166
Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; फोनवरून बोलतांना खडसे झाले भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स मिळाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांना उपचारासाठी तातडीने जळगावहून मुंबईत आणण्यात यश मिळाले होते.

त्यानंतर त्यांच्यावर बॉम्बे रुग्णलायत अँजिओप्लास्टी करण्यात आली. या दुखण्यातून सावरल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन त्यांचे आभार मानले.

…तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं

फोनवर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलताना एकनाथ खडसे थोडेसे (Eknath Khadse) भावूक झाले होते. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं, असे कृतज्ञ उद्गार काढत खडसे यांनी एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले.

(हेही वाचा – Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहृदयतेमुळे मिळाली ‘इतक्या’ तरुणांना शासन सेवेत नियुक्ती)

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?

“काय झालं माहिती आहे का, मला एअर ॲम्ब्युलन्स (Eknath Khadse) मिळत नव्हती. नाशिकला एक एअर ॲम्ब्युलन्स उभी होती. पण त्याला हवाई वाहतूक विभागाकडून (ATC) क्लीअरन्स मिळत नव्हता. पण तुम्ही बोलल्यामुळे लवकर क्लिअरन्स मिळाला. मला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात मला तातडीने ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.”

हृदयात १०० टक्के ब्लॉकेज होते

पुढे बोलतांना खडसे म्हणाले की, “माझ्या (Eknath Khadse) हृदयात दोन धमन्यांमध्ये १०० टक्के ब्लॉकेज होते. तर तिसरा ब्लॉकेज ७० टक्के होता. परिस्थिती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशनचा निर्णय घेतला. त्यावेळी मला एका स्ट्रेचरवरुन दुसऱ्या स्ट्रेचरवर उचलून ठेवत असताना मला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे माझं हृदय बंद पडलं. माझ्या हृदयाला होणारा रक्तपुरवठा, ऑक्सिजनही थांबला. तेव्हा डॉक्टरांनी दीड मिनिटांमध्ये लगेच उपचार केले. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केले.” (Eknath Khadse)

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी अशोक गहलोत यांच्यावर नाराज?)

प्रकृतीत सुधारणा

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: ट्वीट करत तब्येत चांगली असल्याची माहिती दिली.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार मानले. त्यावेळी तुमचं ते विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं, असे खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना संभाषणाच्या शेवटी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची प्रकृती बिघडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. तेव्हा खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. या फोननंतर एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.