विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी बंडाळी केली. तब्बल ३५ आमदार सोबत घेऊन महाराष्ट्र बाहेर गेले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. दुसऱ्याचा दिवशी शिंदे यांनी ३५ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले. याच दिवशी बुधवार, २२ जून २०२२ रोजी राज्य मंत्रिमंडळाचीही बैठक झाली. या बैठकीच्या आधी राज्य सरकारने तब्बल ३५ अध्यादेश काढले. तर २१ जून २०२२ रोजी ६३ अध्यादेश काढले. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या काळातील २ दिवसांत तब्बल १०१ अध्यादेश काढले आहेत.
(हेही वाचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणत ३५ नव्हे ४० सेना आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा!)
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय गुन्हे मागे घेतले
एकनाथ शिंदे ३५ आमदार घेऊन महाराष्ट्राच्या बाहेर गेले, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाले. दुसऱ्या दिवशी स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता आहे, असे ट्विट केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या अधिकारात भरत गोगावले यांना मुख्यप्रपोद पदावर नियुक्त केले. याच दिवशी महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व राजकीय आणि सामाजिक आंदोलनाची गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना संक्रमित झाल्यामुळे ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीत शिवसेनेचे केवळ ३ मंत्री उपस्थित होते, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीच्या आधी महाविकास आघाडी सरकारने तब्बल ३५ अध्यादेश काढले. तर २१ जून २०२२ रोजी ६३ अध्यादेश काढले. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या काळातील २ दिवसांत तब्बल १०१ अध्यादेश काढले आहेत.
(हेही वाचा एकनाथ शिंदेंनी करून दाखवले!)