- वंदना बर्वे
महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणे आता जवळपास निश्चित झाले आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, एका मंत्रालयाने भाजपा हायकामांडचे टेन्शन वाढविले आहे. या मुद्यावरून भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आली आहे. (Shinde-Fadnavis)
(हेही वाचा – Vasai Road रेल्वे स्थानक होणार टर्मिनस; रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा)
महाराष्ट्रात नवीन सरकारच्या शाही शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु आहे. सरकार स्थापन करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निर्माण झालेल्या ओढाताणीमुळे हायकमांड अस्वस्थ झाले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रालयावर दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस मात्र गृह मंत्रालय सोडायला तयार नाहीत. त्यांना गृह खाते सोडायचे नाही आहे. (Shinde-Fadnavis)
(हेही वाचा – Accident News: गोंदियात शिवशाही बस उलटली; ८ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता)
गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या महायुतीतील नेत्यांच्या बैठकीतही गृह मंत्रालयाचा मुद्दा चर्चिला गेला. मात्र दोन्ही नेते अडून बसल्यामुळे गृह खात्याचा निर्णय होऊ शकला नाही. अशात, 2 डिसेंबरपूर्वी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गृह खात्याचा मुद्दा सोडविला जाईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, भाजपा हायकमांड शिंदे आणि फडणवीस यांच्यापैकी कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. (Shinde-Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community