एकनाथ शिंदे आणि Raj Thackeray यांची भेट; चर्चेला उधाण

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

53

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे जाऊन भेटले. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसे नेते संदीप देशपांडे, अमित ठाकरे आणि अमेय खोपकर उपस्थित होते. मंगळवार, १५ एप्रिलला रात्री ९.३० वाजता ही भेट झाली. या भेटीच्या दरम्यान स्नेह भोजनाचे आयोजन होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. नुकत्यात झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी जोरदार भाषण केले, त्यामध्ये मात्र केवळ भाजपा लक्ष्य होते, बाकी कुणावरही टीका केली नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाने फसवल्याच्या भावना त्यामागे होत्या. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसेची अशीच भूमिका राहिली तर त्याचा महायुतीला फटका बसेल, म्हणून राज ठाकरे  (Raj Thackeray) यांची समजूत काढण्याची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोपवली आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवामुळे एकनाथ शिंदे आणि मनसेचे संबंध ताणले गेले होते.

(हेही वाचा Murshidabad मध्ये मुसलमानांनी हिंदूंची जाळली घरे, मंदिरे आणि दुकाने; शाळा बनल्या आश्रयस्थळे)

मनसेकडून अमित ठाकरे माहीम येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण याच मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेतली नव्हती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संबंध ताणले गेले होते. या वादानंतर पहिल्यादांच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या  (Raj Thackeray) भेटीसाठी आले आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.