आम्हाला जे मिळाले ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाले, आम्ही बंड केला नाही, तर आम्ही उठाव केला आहे. हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत होऊ नये म्हणून हे बंड केले. बाळासाहेब महापुरुष आहेत ते आमच्या ह्रदयात होते आणि राहतील. आम्ही बरोबर केले, युती कायम राहावी म्हणून बरेच प्रयत्न केले, हे आजच झाले नाही, अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली.
आम्ही पुन्हा निवडून येणार नाही, आम्हाला काळजी नाही
शिंदे गट आणि भाजपा यांच्या सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकल्यावर त्यांचे अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आमदार गुलाबराव पाटील बोलत होते. मला टपरीवर बसवू म्हणालात. टपरीवाला, रिक्षावाला याला काही काम नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी त्याला मोठे केले, आमच्या प्रारब्धानुसार आम्ही पुढे आलो. अजित पवार म्हणतात, आम्ही पुन्हा निवडून येणार नाही, आम्हाला काळजी नाही. ५५ मधून ४० आमदार कसे फुटतात, साधा कार्यकर्ता फुटतो तरी आम्ही त्यांची विचारपूस करतो. इथे ४० आमदार फुटतात, हे आजचे दुःख नाही. ज्या बाळासाहबांना ‘टी बाळू’ म्हटले त्यांच्या सोबत आम्ही बसलो कारण तुमच्या खातर. प्रत्येक आमदार दुःख सांगायचा, पण चहा पेक्षा किटली गरम. काही लोक म्हणतात, आम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत दाखवत नव्हतो. आम्ही ३०२ गुन्हे अंगावर घेऊन आलो आहोत. एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक आमदाराला बोलावून त्यांची विचारपूस केली. हे आमदार लक्षात घेणार नाही का? आम्ही आपसात लढणार नाही आम्ही शिवसैनिकाला जवळ करून बाळासाहेबांची शिवसेना सुरक्षित ठेवणार. आम्हाला किडे म्हटले, डुक्कर म्हटले, प्रेते बाहेर येतील म्हणाले. आम्ही लेचेपेचे नाही. या दोन वर्षांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री असताना नगरपालिकेत आम्ही ४ नंबरवर गेलो. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा भाजपा १ नंबर वर गेली होती. आम्ही सांगून गेलो नाही, असे म्हटले गेले. २० आमदार आम्ही भेटायला गेलो होतो, सगळे सांगितले. आम्हाला सांगितले गेले तुम्ही पण जा. आमदारांचे फोन उचलत नव्हते. अजित पवार ६ वाजता टेबलवर असायचे, कार्यकर्त्याला भेटायचे. आम्हाला फोटो काढणे तर लांबच शिवराळ भाषा वापरली गेली, असेही आमदार पाटील म्हणाले.
(हेही वाचा चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धव साहेबांना बावळट केले! गुलाबराव पाटलांनी मांडला संताप)
आम्ही रिस्क घेऊन बाहेर पडलो
आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन बाहेर पडलो आहोत. एकीकडे दोन्ही काँग्रेस आहे, दुसरीकडे भाजपा आहे ज्यांच्याशी आमचे अडीच वर्षे जमले नाही, काही लोक आमच्यातून बाहेर जाणार आहेत. आम्हाला समजत नाही आम्हाला त्रास होणार आहे म्हणून, तरी आम्ही हा निर्णय का घेतला? आदित्य ठाकरे फिरू शकले असते महाराष्ट्रात. त्यांचे दौरे पहा. किती ठिकाणी ते फिरले? कुणी पक्ष वाचवण्यासाठी फिरले नाही. एक एकनाथ शिंदे शिवसेना वाचवायला फिरले. जळगाव जिल्ह्यात ५ वेळा आले. शरद पवारसारखा ८० वर्षांचा माणूस ३ वेळा जळगावमध्ये येतो. अजित पवार तीन वेळा आले, जयंत पाटील ५-७ वेळा आले. धनंजय मुंडे, टोपे आले. आमच्याकडे का आले नाही?, असा सवाल आमदार पाटील यांनी केला.
Join Our WhatsApp Community