राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज म्हणजेच गुरुवार २५ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी विमानतळावर दाखल होणार आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) ‘प्रमोद महाजन क्रीडा संकुल’ येथे कार्यक्रमला हजेरी लावणार आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील विविध योजनांमधील लाभार्थी देखील मुख्यमंत्री यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा – HSC 2023 Result : आज बारावीचा निकाल; दुपारी २ वाजता ऑनलाईन पाहता येणार)
याच पार्श्वभूमीवर (Eknath Shinde) कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेली गैरसोय लक्षात घेता शासन आणि प्रशासनाकडून या कार्यक्रमाची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.
हेही पहा –
शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी आणि इलेक्ट्रॉल पावडरची देखील सोय करण्यात आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी वाहन, कृषी यंत्र व कामगार कीटचे प्रातनिधीक स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community