राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या नीती आयोग बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
आज म्हणजेच शनिवार २७ मे रोजी सकाळी मुख्यमंत्री (Eknath Shinde) नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहून राज्याचे मुद्दे या बैठकीत मांडणार आहेत. या बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
(हेही वाचा – Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग जरी वेगवान असला, तरी…’ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला सल्ला )
नीती आयोगाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडणार असल्याचे त्यांनी (Eknath Shinde) सांगितले. तसेच संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
विघ्नसंतोषी लोक नव्या संसद भवनाच्या (Eknath Shinde) लोकार्पणाला विरोध करत आहेत. विरोध करणाऱ्यांना जनता जमाल गोटा देऊन धडा शिकवेल. काही लोक विघ्नसंतोषी असतात. अशा कार्यक्रमाला विरोध करणं हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध लोकशाहीला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते त्यांनी सांगावं. त्यांना ही जी काही पोटदुखी सुटलीय…. जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमाल गोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल.
पुढे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, मराठीत एक म्हण आहे, नावडतीचं मीठही अळणी लागतं, तशी यांची गत आहे. मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं की त्याला विरोध करायचा असा प्रकार सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community