Eknath Shinde: कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी सही, मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

190
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'दिल्ली' गाठणार; जागावाटपाचा तिढा सुटणार ?

कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री सचिवालयाने मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई-ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली.

(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : के एल राहुल पाचव्या कसोटीत खेळणार की नाही?)

मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.