या राज्यात सत्ता जी स्थापन झाली ती कायद्याने आणि बहुमताने स्थापन झाली. काही लोक न्यायव्यवस्थेलाच सल्ले देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाला सल्ले देत आहे. मी त्यावर काय बोलणार? असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.
भावनेवर आणि कुणाच्या म्हणण्यानुसार, आमदार अपात्रतेचा निर्णय होत नाही. लोकशाहीत बहुमताला महत्व असते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना महत्व खूप आहे. सत्ता स्थापन कुणामुळे होते तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळेच. या राज्यात सत्ता जी स्थापन झाली ती कायद्याने आणि बहुमताने स्थापन झाली. देशात, राज्यात कायदा, नियम आणि घटना आहे. त्या नियमांचे आणि कायद्याचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. कुणाला काय वाटते यापेक्षा कायद्याने काय बरोबर आहे हे महत्वाचे आहे. घटना, नियम सर्वोच्च आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. नियम सर्वोच्च आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा ‘ईडी’मुळे विरोधक एकत्र, विरोधकांनी धन्यवाद मानावे; पंतप्रधान मोदींची टीका)
Join Our WhatsApp Community