एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणजे विकासाचे ‘त्रिशूळ’ – देवेंद्र फडणवीस

178
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणजे विकासाचे 'त्रिशूळ' - देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारला मिळालेल्या साथीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कौतुक केले आहे. कौतुक करतांना फडणवीस यांनी या त्रिकुटाला महादेवाच्या ‘त्रिशूळा’ची उपमा दिली आहे. गडचिरोली मधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या वेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

आज म्हणजेच शनिवार ८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकाच मंचावर आले आहेत.

या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, रिक्षाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करतान देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिदुर्गम भागातील लोकांच्या दारापर्यंत महाराष्ट्र सरकार पोहोचत आहे. अजितदादा सोबत आल्याने आता या भागाचा विकास अधिक गतीने होणार आहे.

(हेही वाचा – गडचिरोलीचा विकास व्हावा व नक्षलवाद संपावा, हेच शासनाचे धोरण – उपमुख्यमंत्री अजित पवार)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अजित पवार आमचे जुने साथी व मित्र आहेत. ते आता एकनाथ शिंदे व आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्याने आमचे त्रिशूळ पूर्ण झाले आहे. आमचे त्रिशूळ हे विकासाचे आहे. हे त्रिशूळ राज्याची गरीबी दूर करेल.

तसेच अतिदुर्गम भागातील लोकांच्या दारापर्यंत महाराष्ट्र सरकार पोहोचत आहे. अजितदादा सोबत आल्याने आता या भागाचा विकास अधिक गतीने होणार आहे. गडचिरोलीतून केवळ कच्चा माल दुसरीकडे न्यावा, हे आता थांबायला हवे. अनेक उद्योगांसाठी कच्चा माल गडचिरोलीत उपलब्ध असल्याने आता कारखानेही गडचिरोलीत उभारावेत, यासाठी सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. आता येथून केवळ कच्चा माल नेऊ दिला जाणार नाही. आज छत्तीसगड, ओरिसा व झारखंड येथे पोलाद, स्टील इंडस्ट्री उभी राहीली आहे. गडचिरोली येथेही अशीच स्टील, पोलाद इंडस्ट्री उभी रहावी, असे आमचे स्वप्न आहे. असे झाल्यास गडचिरोलीत अनेक हातांना रोजगार मिळेल. गडचिरोलीत मोठ-मोठे मायनिंग ब्लॉक आहेत. त्यासाठी मोठमोठे उद्योजक गडचिरोलीत येऊ इच्छित आहेत. त्याचा लाभ गडचिरोलीतील शेवटच्या घटकाला व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे.

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नेटवर्कची समस्या दूर करण्यासाठी ५४४ मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गडचिरोलीतील नेटवर्कची समस्या दूर होईल. गडचिरोलीत आम्ही सर्वच घटकांना सोबत घेऊन विकास करून त्यांचे मागासलेपणा दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.