राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे या भेटीत नेमके काय ठरले, राज्य मंत्रीमंडळाचा विस्तारावर शिक्कामोर्तब झाला का, अशी चर्चा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
बैठकीबाबत तर्कवितर्क
दिल्लीमधील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलालेल्या सहकार क्षेत्रासंबंधीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र सहकार क्षेत्रासोबतच इतर सर्वच चर्चा होतील. इतर चर्चांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हे विषय महत्त्वाचे आहेत. सरकारचा पहिला मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा पार पडला. यात अनपेक्षितपणे अनेकांना डच्चू देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल या अपेक्षेवर अनेक नेते आहेत.
(हेही वाचा Love Jihad : विवाहासाठी मुसलमान तरुणाकडून हिंदू तरुणीला ब्लॅकमेल)
Join Our WhatsApp Community