- खास प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेऊन आठवडा झाला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र, मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरला असून एकनाथ शिंदे यांना समाधानकारक खाती येणार असल्याने शिंदे (Eknath Shinde) निश्चिंत आहेत तर अजित पवार अजूनही गॅसवर असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे आरामात
विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले. त्यामुळे त्यांना नगरविकास, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम दिली जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. महत्वाची खाती मिळणार असल्याने शिंदे तणावमुक्त असून याच कारणामुळे शिंदे यांनी दिल्लीला जाणे टाळले आणि ठाण्यात आपल्या घरी आराम करत असल्याचे सांगण्यात आले.
(हेही वाचा – अमित शाहांनी घेतली Sharad Pawar यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण)
दादांच्या दिल्ली वाऱ्या
दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) वारंवार दिल्ली वाऱ्या करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी अजितदादा तीन दिवस दिल्लीला होते मात्र अमित शाह यांची भेट होऊ शकली नाही. गेले दोन दिवस अजित पवार पुन्हा दिल्लीत असून त्यांना हवी ती खाती मिळत नसल्याने तणावात आहेत, असे समजते.
‘अर्थ’ ही गेले
मागील सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ खाते होते. आता फडणवीस सरकारमध्ये अर्थ खाते भाजपा स्वतःकडे ठेवणार असून महत्वाचे एकही खाते पवार यांच्या वाट्याला येणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गृहनिर्माण या महत्त्वाच्या खात्यावरून शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे, असे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community