एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोणाच्या धमकीला घाबरत नाही, मात्र नक्षलवाद्यांकडून मला धमक्या आल्या होत्या. माझ्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना गुप्तचर विभागाने केली होती. तेव्हा शंभुराज देसाई यांनी मला झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी बैठक घातली होती, मात्र सकाळी पावणेआठ वाजता उद्धव ठाकरे यांनी फोन करून एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा न देण्याचे निर्देश दिले. नक्षलवाद्यांनी माझा खून करावा म्हणून झेड प्लस सुरक्षा नाकारली का? असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महामेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले.
त्यावेळी शंभूराज देसाई हे माझ्यासाठी अनऑफिशियली झेड प्लस सुरक्षा (Unofficially Z Plus Security) द्यायला तयार झाले होते, मात्र मी म्हणालो एकनाथ शिंदेला कोणत्या सुरक्षेची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे कोणाला घाबरत नाही. तुम्ही असे का वागलात? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
(हेही वाचा – BMC : म्हाडासह इतर प्राधिकरणांच्या सार्वजनिक शौचालयांमध्ये पुरेशी विद्युत प्रकाशव्यवस्था पुरवा; चहल यांचे निर्देश )
यावेळी मातोश्रीवर गेल्यानंतर मला अर्धा ते पाऊण तास बसवून ठेवले जात होते, अशी शिंदेंनी व्यक्त केली. माझा जाणीवपूर्वक छळ केला गेला, असा गंभीर आरोप त्यांनी केला असून मिटिंग चालू असल्याचे मला सांगून जेव्हा नंतर चौकशी करत होतो, तेव्हा सर्व मोबाईलमध्ये गेम खेळत बसलेले होते, अशी माहिती मिळत होती. मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता. माझा छळ केला जात होता, असा आरोपही एकनाथ शिंदेंनी केला आहे.
हे सर्व का? कशासाठी? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. मी घेणारा नाही, देणारा व्यक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्या माघारी माझ्या अधिकाऱ्यांना बोलवले जात होते. मी अचानक आलो तर अधिकाऱ्यांना खुणावले जायचे, असा आरोपही शिंदेंनी केला आहे. त्या काळामध्ये माझ्या मागे माझ्या घरावर हल्ले करण्यात आले असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community