एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय केलं आहे हे अनेक जणांना कळलेलं नाही. शरद पवारांसारख्या बड्या नेत्याला देखील कळलेलं नाही. कारण शिंदे यांनी जे केलं ते कधीच राजकारणात घडलं नाही असं काही लोकांना वाटतं. काही लोकांना असंही वाटतं की आधी जे बंड झालं त्याचप्रकारचं हे बंड आहे.
( हेही वाचा : OBC RESERVATION : राज्यात किती महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील ओबीसी?)
राजकीय पक्ष म्हणजे एका कुटुंबाची खाजगी मालमत्ता नसते
उदाहरणार्थ राज ठाकरेंनी शिवसेनेतून बंड केलं आणि चांगले तरुण नेते व हजारो कार्यकर्ते घेऊन ते बाहेर पडले आणि त्यांनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला. राणेंनी देखील आपला पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण ते कॉंग्रेस मार्गे भाजपात स्थिरवले. भुजबळ देखील राष्ट्रवादीत सेटल झाले.
परंतु एकनाथ शिंदे यांचं बंड किंवा उठाव हा या सर्वांपेक्षा वेगळा आहे. त्यांना आमदार व खासदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडायचं नाही, त्यांना दुसरी शिवसेना स्थापन करायची नाही किंवा दुसर्या पक्षात देखील जायचं नाही. कोणताही राजकीय पक्ष म्हणजे एका कुटुंबाची खाजगी मालमत्ता नसते हे त्यांना सांगायचं आहे.
पुष्यमित्राला आपल्या राजाचा कारभार आवडला नाही. असा राजा जर सिंहासनावर बसला तर राज्याचं वाटोळं होईल, या राष्ट्रप्रेमाच्या भावनेखातर त्याने उठाव केला. राजाला पाडून स्वतः राजा झाला. वेगळ किंवा प्रति राज्य स्थापन केलं नाही, तर राजाला बाजूला सारुन राज्य बळकावलं आहे.
एकनाथ शिंदेंचा उठाव हा सर्वसाधारण नाही
शिंदेंच्या उठावाकडे या दृष्टीकोनातून पाहता येईल. एकनाथ शिंदेंचा उठाव हा सर्वसाधारण उठाव नसून यामुळे एका राजकीय कुटुंबाचा अस्त होणार आहे. त्यामुळे हा उठाव राजकीय इतिहासात महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महराष्ट्राचं राजकारणात बदलणार आहे, अनेक समीकरणे बदलणार आहेत. हा केवळ ठाकरेंचा अस्त नसून हे परिवारवादाला दिलेलं एक खुल आव्हान आहे.
Join Our WhatsApp Community