Eknath Shinde: भरसभेत मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक

भांडुप पोलिसांनी विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे.

179
Eknath Shinde: भरसभेत मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक
Eknath Shinde: भरसभेत मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक

भरसभेत मुख्यमख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ करणं माजी महापौर दत्ता दळवी यांना भोवलं आहे. दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता दत्ता दळव यांना अटक करण्यात आली आहे.

भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातच संजय राऊत भांडुप पोलीस स्टेशनला जाणार आहेत. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

(हेही वाचा – Double Decker Bus : वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक आता डबल डेकर बसने करा गारेगार प्रवास )

भांडूपमध्ये रविवार (दिनांक 26 नोव्हेंबर) शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे बुधवारी, २९ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.