राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून अनेक निर्णय घेण्यात आले. तसेच विकासाबाबतच्या निर्णयांनाही गती देण्यात आली आहे. आता याच विकासकामांना गती देण्यासाठी सरकार एक संकल्पपत्र लवकरच जनतेसमोर मांडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागप्रमुखांना एक पत्र पाठवले आहे. 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या विभागाच्या कुठल्या कामांचा, योजनांचा समावेश करायचा याबाबत सूचना/ प्रस्ताव पाठवा, असे या आदेशात म्हटले आहे.
लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीवर भर
राज्यात ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नवीन सरकारने प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात असलेल्या लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे.
( हेही वाचा: खुशखबर! ‘या’ रेल्वे स्थानकावर लवकरच सुरू होणार Coach Restaurant )
चर्चा करुन कार्यक्रमाला अंतिम रुप
विविध विभागांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमाचे प्रस्ताव आल्यानंतर, ज्येष्ठ अधिका-यांच्या समितीकडून त्याची पडताळणी केली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन कार्यक्रमाला अंतिम रुप देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community