आता शिंदे गटाकडून युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर

131

सध्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा विषय प्रलंबित आहे. त्यावर निवाडा होणार आहे. सध्या धनुष्यबाण नक्की कुणाचे, हा विषय आत निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आले आहे. मात्र आयोग यासाठी शिवसेनेत संसदीय, विधीमंडळ आणि संघटनात्मक उभी फूट पडली आहे का, याची खात्री करून घेणार आणि मगच शिवसेना चिन्ह उद्धव गटाचे राहणार कि शिंदे गटाला देणार याचा निर्णय देणार आहे. त्यामुळे शिंदे गटही कामाला लागला आहे. शिंदे गटाने आता युवा सेनेला लक्ष्य केले आहे. युवा सेनेची कार्यकारिणी शिंदे गटाने जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात आधी शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार आले, यानंतर १२ खासदारांनीही शिंदेंची साथ दिली, तसेच शिवसेनेचे काही पदाधिकारीही शिंदे गटात गेले, यानंतर आता त्यांनी युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे.

(हेही वाचा मुंबईत होणार हलाल परिषद, भारतात मुसलमानांची होतेय समांतर अर्थव्यवस्था)

शिंदे गटाच्या युवासेनेची अशी असणार कार्यकारिणी

  • उत्तर महाराष्ट्र – अविष्कार भुसे
  • मराठवाडा – अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
  • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
  • पश्चिम महाराष्ट्र – किरण साली, सचिन बांगर
  • कल्याण भिवंडी – दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
  • ठाणे, नवी मुंबई व पालघर – नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
  • मुंबई – समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
  • विदर्भ – ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

(हेही वाचा दसऱ्याच्या दिवशी आधी कुणाचे भाषण ऐकायचे? अजित पवार म्हणतात उद्धव ठाकरेंचे…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.