दसरा मेळाव्यातून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन थेट निशाणा साधणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्याचे गिफ्ट दिले आहे. शिंदे गटातील एका खासदाराला केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आली असून, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.
(हेही वाचा – सेवेत दाखल झाल्यानंतर सहाव्या दिवशीच ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या खासदार प्रतापराव जाधव यांची माहिती-तंत्रज्ञान विषयातील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अधिकाधिक तंत्रस्नेही बनविण्याचे ध्येय निश्चित केले असताना, शिंदे गटाला या विषयातील समितीत स्थान मिळणे, अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात आहे. जाधव हे बुलढाणा मतदारसंघाचे खासदार आहेत. अलीकडेच त्यांनी ‘शंभर खोके, मातोश्री ओके’ म्हणत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत.
केंद्रात पहिली जबाबदारी
याआधी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याकडे माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार होता. मात्र संसदेच्या स्थायी समितीच्या बदलांमध्ये शिंदे गटाला सामावून घेण्यात आले आहे. भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर शिंदे गटाला केंद्रात मिळालेली ही पहिली जबाबदारी आहे.
Join Our WhatsApp Community