शिंदे गटाचा दसरा मेळावा: विद्यापीठातील जागेवर वाहने उभी करण्यास युवा सेना, राष्ट्रवादीचा विरोध

115

मुंबईमध्ये येत्या बुधवारी, ५ ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) होत असून या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या शिवसैनिकांची वाहने उभी करण्यासाठी कलिना येथील मुंबई विद्यापीठाची जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे विद्यापीठातील ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपलब्ध करून देण्यासाठी खुद्द महापालिकेच्या एच पूर्व विभागाने विनंती केली होती आणि त्यानुसार विद्यापीठानेही महापालिकेला ही परवानगी आहे. वाहनतळाच्या सुविधेसाठी विद्यापीठातील मोकळ्या जागेतील गवत काढून त्याच्या सपाटीचे काम सुरु आहे. दरम्यान याला युवासेना, राष्ट्रवादी काँग्रेसेच्या विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवल्याने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वाहनतळासाठी दिलेल्या जागेवरून विद्यापीठाचे कुलसचिव अडचणीत येतात की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

MUMBAI UNIVERSITY

गवत काढून त्याच सपाटीकरण करण्यास सुरुवात

बीकेसीच्या मैदानावर  शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आल्याने याला न भूतो, न भविष्यात असा अभूतपूर्व मेळावा पार पडेल असे शिंदे गटांकडून सांगितले जात आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या स्वाक्षरीने महापालिका एच पूर्व विभागाचे सहायक अभियंत्यांच्या नावे २९ सप्टेंबर रोजी हे पत्र पाठवून मुंबई विद्यापीठातील उपलब्ध जागी पार्किंग करण्याच्या अनुषंगाने आपणामार्फत करण्यास आलेल्या विनंतीला विद्यापीठ प्रशासनामार्फत विद्यानगरी परिसरातील शारीरिक शिक्षण भवनजवळील मैदान, एआयटीए जवळील मोकळी जागा आणि विद्यानगरी उत्तर द्वाराजवळील मोकळी जागा आदी ठिकाणी बीकेसीतील आयोजित सभेकरता  येणाऱ्या वाहनांना उभे करण्यास मान्यता देत असल्याचे कळवले. त्यानुसार वाहने उभी करण्याच्या जागेवरील गवत काढून त्याच सपाटीकरण करण्यास सुरुवात केले जात आहे.

YUVA SENA

(हेही वाचा कोस्टल रोड प्रकल्पाबाबत महापालिकेला न्यायालयाचा दिलासा : आता थांबा नाही, तर पुढे चला!)

मोकळी जागा राजकीय कार्यासाठी वापरण्यास विरोध

याबाबत, युवा सेनेचे पदाधिकारी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देत कलिना कॅम्पसमधील मोकळी जागा राजकीय कार्यासाठी वापरण्यास मज्जाव करत त्यांना वाहनतळासाठी परवानगी देऊ नये, असे म्हटले आहे. विद्यापीठ हे राजकीय व्यासपीठ होऊ नये, याबाबतचा उपयोग इतर राजकीय  पक्षही करू शकेल आणि विद्यापीठ राजकीय अड्डा बनू शकेल, असे म्हटले आहे.  हा निर्णय चुकीचा असून राजकीय दबावापोटीच घेतला असल्याचे सांगत प्रदीप सावंत यांनी युवा सेनेच्यावतीने याला तीव्र विरोध केला केला जाईल, असे सांगितले. अशाप्रकारच्या परवानगीची मान्यता रितसर मान्यता द्यावी लागते, तशी परवानगी दिली नाही, असे त्यांनी सांगितले.

युवा सेनेवर टिका

युवा सेनेला आता काही काम उरलेले नाही. युवा सेनेच्या पोटात आता दुखायला लागले आहे. परंतु आमचा मेळावा हा न भूतो न भविष्यती असाच हा मेळावा होणार असल्याचा पोलिसांचा अहवाल आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात मळमळायला आणि ढवळायला लागले आहे. युवा सेनेचे काम हे नाईट लाईफ, पेंग्विन बघणे, गद्दार आणि खोके बोलण्यावरच त्यांचा भर असतो, परंतु आमच्या मेळाव्याला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळे कुठे तरी गालबोट लावण्याचा प्रयत्न त्यांचा प्रयत्न असून त्यांनी त्यांचे काम करावे, आम्ही हा मेळावा कशाप्रकारे न भूतो आणि भविष्यती होईल यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या प्रवक्त्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.