शिंदे गट झाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’, उद्धव ठाकरेंच्या हाती आली ‘मशाल’

145

अंधेरी (पू.) येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे, तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे, मात्र शिंदे गटाचे चिन्ह अद्याप अंतिम करण्यात आले नसून त्यांना पुन्हा तीन पर्याय सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

कोणत्या गटाने कोणती चिन्हे मागितली?

निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय दिले होते, यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला होता. शिंदे गटाच्या बंडानंतर दोन्ही गटांमध्ये आमचाच गट बाळासाहेबांची शिवसेना आहे, असा दावा करू लागला होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले होते. ठाकरे गटाने पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला होता, तर शिंदे गटानेदेखील उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा पर्याय दिला होता, त्यातील उद्धव ठाकरे यांना ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले.

(हेही वाचा शिवसेनेने तेव्हाही उगवता सूर्य चिन्हावर लढवलेली निवडणूक, पण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.