शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला सोमवारी मुंबईत अपघात झाल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटाचे प्रतोद म्हणून निवड झालेल्या आणि महाडचे आमदार असलेल्या भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात झाला असून त्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मंत्रालयाच्या दिशेने जात असताना इस्टर्न फ्री वेवर हा अपघात झाला.
(हेही वाचा – संकटकाळात साथ दिलीत, तुमच्यामुळे बळ मिळाले; उद्धव ठाकरेंचे आमदारांना भावनिक पत्र)
मुंबईतील फ्री वेवर वाडीबंदर जवळ गोगावले यांच्या कारला अपघात झाला. यावेळी सात ते आठ गाड्यांची एकमेकांना धडकल्या आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातात भरत गोगावले यांच्या वाहनाला मागच्या आणि पुढच्या बाजूने जोरदार धडक बसली. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले थोडक्यात बचावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुंबईच्या ईस्टर्न फ्री-वेवर सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकल्याने या सर्व गाड्यांचे नुकसान झाले. ईस्टर्न फ्री-वेवर वेगाने जात असताना गोगावले यांच्या पुढे जाणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर भरत गोगावले यांनी असे सांगितले की, सात ते आठ गाड्या एकमेकांवर धडकल्या. मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही. कोणीही काळजी करु नका, आम्ही सगळे सुखरुप आहोत.
Join Our WhatsApp Community