राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांत अनेक अनपेक्षित घटना घडल्याचे दिसले. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण राज्यभरात देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले. अशातच मीरा भाईंदरमध्ये भाजप समर्थकांनीही बॅनरबाजी केली होती. पण ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे.
(हेही वाचा – …तर आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन, चित्रा वाघ यांचा इशारा)
या बॅनर्सवर चक्क उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिण्याचा प्रताप केल्याचे समोर आले आहे. शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावात मोठा घोळ घालण्यात आल्याचे समोर आले आहे. लावण्यात आलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस न लिहिता देवेंद्र फर्नांडिस असा उल्लेख करण्यात आला आहे.
कुठे लावण्यात आले हे बॅनर
मीरा रोड येथील शांतीनगर भागातील जैन मंदिराच्या परिसरात हे बॅनर्स लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बॅनर्सवरील देवेंद्र फर्नांडिस असा उल्लेख सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. स्वीकृत नगरसवेक विक्रम प्रतापसिंह यांनी हे बॅनर्स लावले होते. या बॅनर्सचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
Join Our WhatsApp Community