मी आणि पक्षाचे सचिव अनिल देसाई हे दोघे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून आमच्या पक्षांतर्गत वादामुळे संसदेतील एकच कार्यालय दोन जण वापरत आहेत, असे सांगितले. त्यावर त्यांनी आपण त्यांना दुसरे कार्यालय देऊ, असे बिर्ला म्हणाले. आम्ही त्यांना लगेच पत्र दिले, पण ठीक आहे आज निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ते संसदेतील आणि विधानसभेतील कार्यालय ताब्यात घेत आहेत. त्यांचा हा आनंद औटघटकचा आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत आणि सुनावणी सुरु आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.
आम्ही कायदेशीर लढाई लढू
मूळ पक्ष शिवसेना आहे याचे भान न ठेवता हा निर्णय देण्यात आला आहे. जे हिसकावून घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे, वेळ आली कि सगळे सोडावे लागणार आहे किंवा ताब्यात घेतले जाईल. हे राजकरण आहे कुणीही कायम सत्तेवर नसतो, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, तिची मुळे खोलवर रुजलेली आहेत. आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय मानणारे नाहीत, आमचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि तिचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. जोवर दिल्लीतून डोंबारी डंबरू वाजवत असतील तोवर माकडे नाचत असतील, २०२४ साली खेळ संपलेला असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संसदेतील नेतृत्व माझ्याकडे आहे, त्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई लढू, विधानसभेच्या खुर्चीवर नरहरी झिरवळ बसले होते, त्यांनी १६ आमदारांचे निलंबन केले आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने निर्णय देणे चुकीचे आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही हा मुद्दा पकडला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा ठाकरे गटाच्या याचिकेवर आता 22 फेब्रुवारीला होणार सुनावणी)
Join Our WhatsApp Community