आता ठाकरे गटाच्या नाशिक येथील कार्यालयावरही शिंदे गट करणार दावा; कारण…

89
नाशिकमध्ये ठाकरे गटातून तब्बल ५० पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. हा संजय राऊत यांना मोठा फटका मानला जात आहे. तेव्हापासून संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. तसेच जे पदाधिकारी सोडून गेले, त्याच्यावर जहरी टीका करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी थेट संजय राऊतांवर प्रति हल्ला करत नाशिक येथील आधीच्या शिवसेनेच्या मुख्यालयावरही आम्ही दावा करणार आहोत, असे म्हटले आहे.
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट ठाकरे गटावर आव्हान दिले. संजय राऊत म्हणतात, ‘मी जे गेले त्यांना ओळखत नाही.’ पण तुम्हाला सांगतो. माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे. या मध्यवर्ती कार्यालयावर आम्ही दावा करणार आहोत, असा इशाराच रुपेश पालकर यांनी दिला. तर, राऊत फक्त हिशोब घ्यायला नाशिकला येतात, असा आरोप प्रवीण तिदमे यांनी केला आहे. आमचा खरा देव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या सोबत आहेत. तुम्ही स्वतः सरपंचपदाची निवडणूक लढवली नाही. राऊत यांचा डीएनए शिवसेनेचा नाहीच, अशी टीका शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते यांनी केली.

संजय राऊतांना आव्हान 

संजय राऊत हे शरद पवारांकडे जाऊन शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. संजय राऊत तुडवा तुडवी काय असते हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. कुठे यायचे ते सांगा. आम्ही पालापाचोळा आहोत का ते दिसून येईल, असे आव्हानच शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.