गेल्या दोन महिने आजारी असल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पदभार कोणी सांभाळावा, याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यभार आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवावा अथवा पत्नी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी बसवावे असे सुचवले होते. ठाकरे कुटुंबीयांतील सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणाचे नाव ‘तसे’ चर्चेत आले नाही. अशा परिस्थितीत आता ठाण्यात सध्या जे बॅनर लावण्यात आले आहेत, ते बघता ठाण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नंतर मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल याची घोषणा केली आहे.
ठाण्यात शिवसैनिकांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असून त्यांची त्यांच्या मतदार संघात मोठी लोकप्रियता आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली होती. तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीत घेण्यात येत होतं.
(हेही वाचा – स्मारकाचा वाद तापणार? राऊत म्हणताय लता दीदींचं स्मारक होईल पण…)
नेमका काय आहे प्रकार
सुरुवातीपासूनच मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. पण आता शिवसैनिकांनी चक्क त्यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टरचं ठाण्यात लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. 9 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आगामी वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदेच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे नाव टाकून भावी मुख्ममंत्री असे लिहिले आहे. ठाण्यातील या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
या बॅनरमुळे चर्चेला आले उधाण
असे सांगितले जात आहे की, ठाण्यातील वागळे इस्टेट भागात लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी एकनाथ शिंदे हे भावी मुख्य्मंत्री, अशा आशयाची बॅनरबाजी केल्याचे समोर येत आहे. मात्र या रंगलेल्या चर्चांना एकनाथ शिंदेंनी कोणतेही उत्तर दिले नसून यावर ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.
Join Our WhatsApp Community