धनू भाऊ, चाराण्याचे चणे खाऊ…

175

हे पावसाळी अधिवेशन धनंजय मुंडे यांच्यामुळे लक्षात राहणार आहे. सध्या अधिवेशनात जोरदार फटकेबाजी सुरु आहे. “महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो हे दुर्दैव आहे. तर राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये ” असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

( हेही वाचा : महिला आमदारांना वेश्या म्हणणे हीच का शिवसेनेची संस्कृती; आमदार मनीषा चौधरी यांचा हल्लाबोल)

ऐकनाथ म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशार्‍यावर चालू नये, त्यांचं ऐकून काम करु नये. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान बॅटिंग करत धनंजय मुंडे यांची बोलती बंद करुन टाकली. मुळात आपण काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलतोय आणि कोणत्या परिस्थितीत बोलतोय याचं भान धनुभाऊंनी ठेवलं पाहिजे. आपली प्रकरणं गाजत असताना इतरांच्या प्रकरणांवर भाष्य करु नये. स्वतःचं झाकून ठेवलेलं उघड झाल्यानंतर दुसर्‍यांचं वाकून बघायला जाऊ नये हा एक साधा सरळ नियम असतो.

पण हाच नियम धनू भाऊ विसरले आणि त्यांनी आधी जोरदार घोषणा दिल्या आणि नंतर एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. एकनाथ शिंदेंनी जे शब्द वापरले ते खूप महत्वाचे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी दया, करुणा दाखवली. पण प्रत्येक वेळी दाखवतीलच असं नव्हे. ज्या करुणा मुंडेंच्या प्रकरणामुळे धनू भाऊ बदनाम झाले, त्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत रान पेटवलं नाही. म्हणजे त्यांनी या प्रकरणात जणू धनू भाऊंना अभय दिलं होतं.

तुम्ही जर नको ते आरोप आमच्यावर कराल तर ते प्रकरण पुन्हा बाहेर येऊ शकतं असं एकनाथ शिंदे यांनी धनू भाऊंना बजावलं आहे. त्यामुळे धनू भाऊ क्लीन बोल्ड झालेले आहेत. एकनाथ शिंदे हे एक उत्तम वक्ता म्हणून समोर येत आहेत. इतकी वर्षे हा चांगला वक्ता शिवसेनेने लपवून ठेवला होता. शिंदे ज्याप्रकारे कोपरखळ्या मारतात ते खरंच कौतुकास्पद आहे. आता धनू भाऊ सहसा शिंदेंच्या फंद्यात पडणार नाहीत. कारण राजकारणातले आपण प्रौढ आहोत आणि धनू भाऊ आपल्यासमोर बालक आहेत असं शिंदेंनी दाखवून दिलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.