Eknath Shinde यांच्या मतदारसंघातील वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर?

48
Eknath Shinde यांच्या मतदारसंघातील वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर?
  • सुजित महामुलकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. हे वाढीव मतदान शिंदे यांच्या विरोधात जाईल की पथ्यावर पडेल? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.

खरी लढत शिंदे विरुद्ध दिघे

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध शिवसेना उबाठाने, शिंदे यांचे गुरु आनंद दिघे यांच्या भाच्याला, केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदारसंघात एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून खरी लढत शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध दिघे अशीच होणार आहे. निवडणूक निकाल शनिवारी २३ नोव्हेंबर २०२०४ या दिवशी लागणार आहे.

(हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजने’चा फायदा कुणाला? DCM Devendra Fadnavis म्हणाले, मतदानाचा टक्का…)

९०,००० मताधिक्य

२०१९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे संजय घाडीगावकर होते. त्यावेळी ४९.२७ टक्के मतदान झाले होते आणि शिंदे यांनी घाडीगावकर यांचा जवळपास ९०,००० मतांनी पराभव केला.

चारही पक्ष वेगळे लढले

२०१४ मध्ये शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. तेव्हाही ५३.१० टक्के मतदान झाले होते. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे निवडणूक रिंगणत होते तर भाजपाकडून संदीप लेले आणि काँग्रेसकडून मोहन गोस्वामी तर राष्ट्रवादीकडून बिपिन महाले होते. त्यावेळीही शिंदे जवळपास ५२,००० मताधिकयाने विजयी झाले होते.

(हेही वाचा – Shubman Gill : शुभमन गिल पर्थमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होणार?)

शिंदे यांच्या पथ्यावर

बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी मतदान झाले आणि मागील दोन्ही निवडणुकीपेक्षा मतदान अधिक झाले. यावेळी ५९.८५ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे काल मतदान झाले त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एक उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकीत शिंदे यांना झालेले मतदान आणि शिंदे यांची लोकप्रियता विचारात घेता, यावेळी झालेले वाढीव मतदान शिंदे यांच्या पथ्यावर पडेल, असे चित्र आहे. २०१४ मधील ९० हजार मताधिक्यचा आता रेकॉर्ड मोडणार का? याबाबत ठाणे जिल्ह्यात चर्चा आहे.

शिंदे यांच्या विरोधात उभे असलेले उबाठाचे उमेदवार केदार दिघे हे आनंद दिघे यांचे भाचे असले तरी मतदार संघात शिंदे यांच्या तुलनेत दिघे यांच्याकडे तगडा उमेदवार म्हणून पाहिले जात नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.