Eknath Shinde यांनी केल्या १० मोठ्या घोषणा; लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रु. देणार

198

महायुतीची संयुक्त सभा मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात झाली. त्यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली. 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आजही आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथे येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील 10 कलमे जनतेच्यासमोर ठेवतो आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा सांगितली. त्यानुसार, लाडक्या बहिणींना  2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली.

(हेही वाचा Mahim Constituency : सदा सरवणकर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची)

एकनाथं शिंदे (Eknath Shinde) यांनी कोणत्या घोषणा केल्या? 

  • लाडक्या बहिणींना रु. 2100 प्रत्येक महिन्याला रु. 1500 वरुन रु. 2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करणार
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देणार
  • प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार
  • वृद्ध पेन्शन धारकांना रु. 2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देणार
  • जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार
  • 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देणार
  • 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार  राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधणार
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देणार
  • वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
  • सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करणार

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.