-
मुंबई प्रतिनिधी
पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या भेटीमध्ये शिंदे यांनी काही तक्रारी केल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, ही भेट सौजन्य होती की राजकीय तक्रारींसाठी, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी पुण्यात अमित शाह (Amit Shah) यांचे विविध कार्यक्रम असून, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत. याच दरम्यान, मागील काही बैठकींना अनुपस्थित राहिलेल्या शिंदेंच्या नाराजीच्या चर्चाही रंगल्या आहेत.
(हेही वाचा – तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी Megablock ; कोणत्या लोकल रद्द? वाचा …)
विदर्भ दौऱ्यात “मला हलकं घेऊ नका… नाहीतर टांगा पलटी होईल” असे विधान करून शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे कुणाला इशारा दिला, याबाबत वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून शिंदे नाराज होते, तसेच गृहमंत्रीपद शिवसेनेला हवे होते, या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेत धुसफूस असल्याच्या चर्चा होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील राजकीय मतभेद वाढत असल्याचे बोलले जात आहे. काहींना वाटते की शिंदेंचा इशारा भाजपाला (BJP) आहे, तर काहींच्या मते तो विशिष्ट नेत्यांसाठी होता. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community