महायुतीच्या महाप्रचंड विजयानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. दरम्यान दि. २७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत घेऊन मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीचा सर्वात मोठा विजय झाला. त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे मी आभार मानतो. कारण जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी ही वाढली आहे. मी काल, आज आणि उद्या नेहमी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि करत राहिन. मी स्वत: ला कधीच मुख्यमंत्री समजलं नाही, मी कॉमन मॅन म्हणून काम केले. त्यामुळे मला कधीही अडचण आलेली नाही. राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही पुढे नेली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत केले. (Eknath Shinde)
( हेही वाचा : Shaktikanta Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ?)
दरम्यान माझ्या कामाबद्दल मी समाधानी असून लाडका भाऊ ही माझी प्रतिमा सर्व पदांपेक्षा महत्त्वाची आहे. राज्यातील सगळ्या विकासकामात केंद्रातून मोदी, शाह यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे अडीज वर्षात मी ऐतिहासिक निर्णय घेऊ शकलो. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे आभार मानतो. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल. त्यामुळे मी त्यांना फोन करून सांगितले की, माझ्यामुळे कोणतीही अडचण मानू नका. भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय मुख्यमंत्रीपदाबाबत घेतील, तो निर्णय शिवसेनेला मान्य असेल, असे ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Eknath Shinde)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community