मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत. याबाबत शिंदे म्हणाले की, घरात फेसबुक लाईव्ह करून काहीही होत नाही. त्यासाठी जनतेत जावं लागतं.
शिंदे पुढे म्हणाले की, आधी जी कामे झाली नाहीत. ती कामे १० वर्षांत मोदी गॅरंटीमध्ये करण्यात आली. सरकार हे संवेदनशील असायला पाहिजे. घरात बसून फेसबुक लाईव्ह न करता फेस टू फेस जावे लागते. सध्या देशभरात मोदी गॅरंटी बोलत आहे.
(हेही वाचा – Anniversary Wishes In Marathi : ‘हे’ शब्द वापरून मराठीत द्या वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा!)
मच्छीमारांची मागणी पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचेही यावेळी शिंदेंनी सांगितले तसेच महिला वॉर्डमध्ये पुरुष उमेदवार उभा राहू शकत नाही. महिलाच कुटुंबाचा आधार असतात.त्यांना त्यांच्या पगारावर उभे करणे हीच काळाची गरज आहे. पायलटपासून युद्ध पाणबुडीपर्यंत सगळीकडे महिला आहेत. आपल्या देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपतीदेखील आपल्या महिला भगिनी आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर संधी देण्याचा बहुमान आपल्या देशाला मिळालेला आहे. म्हणूनच नारी शक्ती कुठेही मागे नाही. मोदींनी महिला आरक्षणाचा निर्णय घेतला. महिलांना प्रत्येकी १ लाख देणारी ही पहिली महापालिका आहे. महिला सुरक्षेसाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्याने अहंकार बाजूला ठेवला पाहिजे
तसेच कुठल्याही महिलेला कोणतीही अडचण असेल, तर त्यांना तात्काळ मदत मिळायला हवी. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन लवकरात लवकर महिलांना मदत मिळवून देण्याच्या सूचना शिंदेंकडून देण्यात आल्या आहेत. ६० लाख महिलांना जोडले आहे, आता ही संख्या २ कोटींपर्यंत गेली पाहिजे. आधीच्या सरकारने अहंकार पाहून सर्व बंद केले होते. राज्याने अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. स्वत:ला कडकसिंग बनवल्यावर कोण भेटेल, यामुळे अंतर वाढत जाते, अशी टीकादेखील त्यांनी ठाकरेंवर केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community