‘आझमी, छावा बघा छावा’; Eknath Shinde अबू आझमींविरोधात आक्रमक

62
'आझमी, छावा बघा छावा'; Eknath Shinde अबू आझमींविरोधात आक्रमक
'आझमी, छावा बघा छावा'; Eknath Shinde अबू आझमींविरोधात आक्रमक

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल एक विधान केले, ज्यानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला. अधिवेशनात कामकाज वारंवार तहकूब करण्यात येत होते. त्यातच अबू आझमींच्या (Abu Azmi) विधानावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आक्रमक होताना दिसले. त्यांनी अबू आझमींचा (Abu Azmi) चांगलाच समाचार घेतला.

( हेही वाचा : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; BEST Bus मधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, काल याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंगजेबाचे गोडवे अबू आझमी (Abu Azmi) यांनी गायले. खरं म्हणजे अबू आझमींचा निषेध करायला पाहिजे. मी अबू आझमीचा धिक्कार करतो. यापूर्वीही आझमींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त विधान केले होते. हा अबू आझमी वेळोवेळी आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) अपमान करत असतो, अशी टीका ही आझमी यांच्यावर केली.

पुढे शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) देशासाठी बलिदान केलं. आपल्या प्राणाचे बलिदान केले पण धर्म बदलला नाही. अशा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे अबू आझमी (Abu Azmi) हे देशद्रोही आहेत. म्हणून देशद्रोह्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाहीये. आपण छावा (Chhaava) बघा रईस, छावा सिनेमा बघा.चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले, नखं काढले, त्यांची जिभ झाटली, त्यांच्या अंगावर मिठ टाकले. चाळीस दिवस त्यांचे हाल केले, असेही शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.