कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा अत्यंत निषेधार्थ प्रकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची जाणीव कर्नाटक सरकारनेही ठेवायला हवी, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.
( हेही वाचा : कर्नाटकातील काँग्रेस सरकार विधानसभा सभागृहातून काढणार Veer Savarkar यांची प्रतिमा; भाजपाकडून निषेध)
तसेच शिंदे (Eknath Shinde) पुढे म्हणाले की, विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी देखील कर्नाटकातील सभापतींना कळवून स्वातंत्र्यवीर सावरकारांची प्रतिमा काढू नये, असे आवाहन केले आहे. सरकारदेखील नीलम गोऱ्हे यांच्या भूमिकेशी सहमत आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकाराचा मी धिक्कार करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ म्हणाले. त्याचबरोबर दडपाशी करणाऱ्या कर्नाटकच्या सरकारला महाराष्ट्रातील आणि तिथली जनता शिक्षा देईल, असे ही शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले.
दरम्यान याप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कर्नाटकच्या या भूमिकेचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका ही बावनकुळे यांनी केली. (Eknath Shinde)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community