“सीएम म्हणजे कॉमन मॅन, पूर्वीचे तर…”, मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा ठाकरेंना चिमटा

163
"सीएम म्हणजे कॉमन मॅन, पूर्वीचे तर...", मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा ठाकरेंना चिमटा

गंगापूर रोड परिसरातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, सिडकोचे अध्यक्ष व आमदार संजय शिरसाठ, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर आदी उपस्थित होते.

(हेही वाचा-महानुभाव पंथाच्या तीर्थस्थान विकासासाठी आणखी भरघोस निधीची तरतुद करणार: Devendra Fadnavis)

बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू उलगडणारे हे स्मृती उद्यान आहे. उद्यानात येणार्‍या प्रत्येकाला प्रेरणा मिळेल, युवकांना ऊर्जा मिळेल, असे हे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान असून, यासाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

(हेही वाचा-Organic Waste Composting : सोसायट्यांच्या कचर्‍यापासून खतनिर्मिर्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज)

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) पुढे म्हणाले की, उद्यानातील साहसी खेळ, कलादालन, सॉफ्ट स्किल प्रशिक्षण, वाचनालय, ई-वाचनालय हे नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरणारे असून, जागतिक दर्जाचे हे उद्यान असणार आहे. शहराचा विकास म्हणजे पायाभूत सुविधा, रस्ते, इमारती याने होत नाही, तर सर्वसामावेश विकास करीत असताना सर्वसामान्यांना विरंगुळा वाटावा, उद्यान म्हणजे ऑक्सिजन सेंटर असावे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंना चिमटा
सर्वसामान्य माणसाला काय हवे याचा विचार करणारा मुख्यमंत्री हवा असतो. सीएम म्हणजे कॉमन मॅन असे मानणारा मी मुख्यमंत्री असून, सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटणारा मी मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मुख्यमंत्र्यांने लोकांना भेटण्यासाठी खाली यावे. अन्‌ पूर्वीचे तर घरात बसून, सुरक्षेच्या गराड्यात राहणारे मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) टीका केली.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.