एकनाथ शिंदेंनी करून दाखवले!

शिवसेनेचे पहिल्या फळीचे नेते, गटनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३५ हुन अधिक आमदार फोडून महाराष्ट्राच्या बाहेर गेले. त्यामुळे ५५ संख्याबळ असलेल्या शिवसेनेकडे आता अवघे १० ते १५ आमदारांचे संख्याबळ उरले आहेत. शिवसेनेनेही तातडीने शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले, मात्र त्याच वेळी शिंदे यांनी मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची केली. अशा प्रकारे शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात अनेक बंडाळ्या झाल्या, त्या त्या वेळी शिवसेना संपवणार अशी वल्गना अनेकांनी केली, मात्र एकनाथ शिंदे यांनी हे करून दाखवले, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आजवर झालेल्या बंडाळ्या! 

छगन भुजबळांनी ९ आमदार फोडले – १९९१ साली छगन भुजबळ हे शिवसेनेमधून जेव्हा बाहेर पडले तेव्हा सोबत ९ आमदार फोडले होते. त्यावेळी भुजबळ हे शिवसेनेतील प्रमुख नेता होते. त्यांच्या बंडाळीमुळे शिवसेना संपणार अशी चर्चा सुरु होती, मात्र तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही बंडाळी पचवून शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी दिली.
नारायण राणे ११ आमदार घेऊन गेले – २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राणे यांना मुख्यमंत्री पदावर हटवले त्यामुळे ते नाराज झाले होते, त्यावेळी राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा सोबत ११ आमदार घेऊन बाहेर पडले होते. तेव्हाही शिवसेनेला मोठे नुकसान होणार अशी चर्चा होती, तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतील ही बंडाळीही पचवली आणि शिवसेना पुन्हा सुरूच ठेवली.
राज ठाकरेंकडून शिवसेनेत उभी फूट – २००५ साली राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. पक्षाचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे अन्याय करतात म्हणून राज ठाकरे यांनी शिवसेनेला राम राम ठोकला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचे ११ आमदार निवडून आणले. मात्र तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही बंडाळीही सहन करून शिवसेना वाढवली.
एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेला भगदाड – शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ३५ आमदार फोडून शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ ५५ आहेत. त्यामध्ये ३५ आमदार फोडून शिवसेनेने शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. ही शिवसेनेतील आजवरची सर्वात मोठी बंडाळी आहे. यावेळी मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाहीत. सध्याचे चित्र पाहता शिवसेनेत ज्या प्रमाणात फूट पडली आहे, ती शिवसेनेला मोठा फटका देणारी आहे. ही बंडाळी उद्धव ठाकरे कितपत पचवतात हे पहावे लागेल. शिवसेना संपवण्याचे जे भुजबळ, राणे आणि राज ठाकरे यांना जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here