मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाला हात दाखवला अशी अफवा पसरवल्यानंतर “दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासाला धक्का बसल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात,” अशी टीका शरद पवार यांनी केली. त्यास उत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्हाला ज्यांना हात दाखवायचा होता, त्यांना आम्ही तो ३० जून रोजीच दाखवलेला आहे.”
( हेही वाचा : दिव्यांग मंत्रालयासाठी २ हजार ६३ पदांना मंजुरी)
खरं पाहता, ज्योतिषाला हात दाखवणे किंवा न दाखवणे हा मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधानाने त्यांना दिलेले स्वातंत्र्य शरद पवार हिसकावुन घेऊ शकत नाहीत. दुसरा मुद्दा असा की एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना दिलेले उत्तर अतिशय महत्वाचे आहे. ३० जूनला त्यांनी हात दाखवलेला आहे. मागे एकदा भाषण करताना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले, “उसने अपुन को मारा, अपुनने उसको दो मारा, लेकिन सॉलिड मारा की नै.” आणि त्यांचा हा डायलॉग खूप गाजला होता. मुळात अमिताभ बच्चन यांचा हा डायलॉग…
आता एकनाथ शिंदे यांनी देखील तशाच प्रकारचं उत्तर दिलं आहे. खरं पाहता महाविकास आघाडी सरकार पडलं याचं दुःख उद्धव ठाकरेंना जेवढं झालं नसेल त्यापेक्षा कैक पटीने शरद पवार यांना दुःख झालं आहे. कारण महाविकास आघाडी हे शरद पवारांचं बाळ आहे. हे सरकार स्थापन व्हावं आणि भाजप सत्तेबाहेर राहावा यासाठी पवारांनी पुढाकार घेतला आणि त्यांचे उजवे हात संजय राऊत यांनी त्यांना सहकार्य केलं. त्यामुळेच संजय राऊत हे बळजबरीचे चाणक्य होऊन फिरत होते.
आणि या सर्वांचा गोड-गैरसमज एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी दूर केला. आपण केवळ एक प्यादे नसून आपणही राजा होण्यास सक्षम आहोत हे शिंदेंनी दाखवून दिलं आणि ज्यांना राजकारणातले ज्येष्ठ व माहिर खेळाडू म्हटलं जातं ते शरद पवार चेकमेट झाले. मुळात त्यांचा सन्मान दुखावला गेला. कारण शिंदे-फडणवीस या जोडीने मिळून त्यांचा इतक्या वाईटरित्या पराभव केला, आधी निवडणुकीत आणि मग राजकीय मंचावर…
सनी देओल हा ऍक्शन हिरो होता. चित्रपटात कोणालाही उचलून फेकणं हा त्याचा आवडता छंद. अर्थात त्याला ती ऍक्शन शोभून दिसायची. त्याचा एक गाजलेला डायलॉग आहे. “ये ढाई किलो का हाथ जिसपर पड़ता है वो उठता नही, उठ जाता है…” एकनाथ शिंदे यांचा हात ढाई किलोचा आहे. त्यांचा हात सत्तेवर पडला आणि केवळ सत्ता पालटली नाही तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे फुटला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेआधी एकनाथ शिंदे यांना अधिक डिवचण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा एकदा हा ढाई किलो का हात पडू शकतो.
Join Our WhatsApp Community