Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांच्या घरांना केंद्राची सुरक्षा, CRPF चे जवान तैनात

156

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहटीमध्ये आपलं ठाणं मांडून आहे. दरम्यान, राज्यकीय सत्तानाट्यादरम्यान मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी आमदारांच्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरले असून बंडखोरांच्या विरोधात पोस्टरबाजी देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आमच्या कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी एकनाथ शिंदे गटाने केली होती. याकरता शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यपालांना देखील या गटाने पत्र लिहिले होते. यानंतर केंद्राने मोठा निर्णय घेत बंडखोर आमदारांच्या घराला सुरक्षा प्रदान केल्याचे दिसून येत आहे.

शिंदे यांच्यासोबतच बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच चर्चा झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील १५ आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.

(हेही वाचा – राज्यपालांची कोरोनावर मात, रूग्णालयातून डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना येणार वेग?)

बंडखोर आमदारांच्या घराला सुरक्षा देण्याचं काम केंद्र सरकार करणार आहे. केंद्राने आमदारांच्या कुटुंबीयांना वाय प्लस श्रेणीमधील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आमदारांच्या घरासमोर सीआरपीएफ जवान रविवारी संध्याकाळी घराबाहेर तैनात केला जाणार आहेत. दरम्यान, बंडखोर आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्याने शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी असे म्हटले की, या बंडखोरीमागे भाजपचे कारस्थान असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.