भाजपकडून एकनाथ शिंदेंना मोठी ‘ऑफर’

एका बाजूला शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडली आहे. त्यात शिवसेनेचे ३५ आमदार फुटले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पर्यायाने महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आले आहे. या शिंदे गटाला आता भाजपकडून संपर्क करण्यात आला आहे. भाजपने यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तेत किती वाटा देणार याची ऑफर दिली आहे.

राज्य सरकारमध्ये १० मंत्री पदे

भाजपने या एकनाथ शिंदे गटाला भाजपाला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यावा, त्याबदल्यात भाजपने एकनाथ शिंदे गटाला सत्तेत वाटा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाला राज्य सरकारमध्ये १० मंत्री पदे दिली जातील, ५ राज्य मंत्रीपदे दिली जातील आणि केंद्रात २ मंत्रीपदे दिली जातील, ते भाजपच्या या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे गटाला २० टक्के हिस्सा देण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हा प्रस्ताव स्वीकारतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here