भाजपाने दिलेल्या बहुमत चाचणीच्या प्रस्तावानंतर राज्यपालांनी बोलावले ३० जून रोजी विशेष अधिवेशन

शिवसेनेचे ३५ आमदार घेऊन महाराष्ट्राबाहेर निघून गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गट अधिक सक्रिय झाला, त्यामुळे राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी, २८ जून रोजी सकाळी दिल्लीत गेले, दुपारी मुंबईत परतले आणि तात्काळ भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर रात्री ९.४५ वाजताच्या दरम्यान भाजपाचे सर्व महत्वाचे नेते थेट राजभवनात पोहोचले आणि भाजपाकडून राज्यपालांना बहुमत चाचणीचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी 30 जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे ४० आमदार जमले आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आल्याचे दिसत आहे, म्हणून आम्ही राज्यपालांना भेटून विश्वास दर्शक ठरवासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. त्यावर राज्यपाल उचित निर्णय घेतली, अशी आशा आहे. आम्ही पत्रासोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील मुद्देही मांडले आहेत.
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

फडणवीस दिल्लीहून परतल्यावर राजकीय घडामोडींना वेग

एका बाजूला शिंदे गट मविआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयावर ठाम राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे ४० आमदारांचे संख्याबळ घटणार आहे. हे सरकार अल्पमतात आले आहे. म्हणून आता राज्यात महाविकास आघाडी सरकारला पर्याय देण्यासाठी भाजपा प्रयत्नरत आहे, असे चित्र दिसत होते. मात्र त्यासाठी राजभवन हे मुख्य केंद्र बनेल असा कयास व्यक्त होत होता. त्यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरून मुंबईत येताच ते भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन राजभवनात दाखल झाले. त्यावेळी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकार मागील चार दिवसांत मोठ्या संख्येने शासन निर्णय घेतले आहेत. त्याविषयी शंका उपस्थित करत भाजपाने राज्यपालांना यावर लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्यपालांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याविषयी राज्यपालांशी चर्चा केली.

विश्वासदर्शक ठरावाबाबत प्रस्ताव  

शिंदे गटामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे कालपर्यंत भाजपा मात्र पडद्याआड राहत होती, मात्र आता भाजपा राजभवनात गेल्यामुळे तिथे भाजपाने बहुमत सिद्ध करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर 30 जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here