शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा! एकनाथ शिंदेंचे आवाहन

102
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापले आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. दिवसभरातील घडामोडींनंतर आता बंडाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये शिवसैनिकांनो, नीट समजू घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा, असे सांगत सावध राहण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे.

काय म्हटले आहे शिंदे यांनी ट्विटमध्ये?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शनिवार सकाळपासूनच विविध घडामोडी घडताना दिसल्या. राज्यातील विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी हल्ला करत तोडफोड केली. तसेच शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. तर दुसरीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर १६ आमदारांना नोटीस पाठवत त्यावर सोमवार, २७ जूनपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. अशा सर्व परिस्थितीत आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी शिवसैनिकांना एक प्रेमाचा सल्ला दिला आहे. ‘शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखाप्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे., असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.