पक्षाच्या प्रमुखांनाच पक्षाबाहेर काढणारे आतापर्यंतचे राजकीय बंड 

91

56 वर्षे जुन्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात सर्वात मोठ्या फुटीचा सामना करावा लागत आहे. पण, ही पहिलीच बंडखोरी नाही, देशात याआधीही अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झाली आणि दिग्गज नेत्यांना आपल्याच पक्षातून बाहेरचा रस्ता शोधावा लागला.

शिवसेनेला निष्ठावंतांचा ‘जय महाराष्ट्र’

शिवसेनेने आपले कट्टर राजकीय विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली. महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षे चालले. पण, सत्तेच्या या खेळात निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण झाली. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला, मतांच्या संख्येने एक गोष्ट स्पष्ट केली की, शिवसेनेत सर्व काही आलबेल नाही. दहा दिवसांनंतर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यातही महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार पराभूत झाला. सूत्रांनी सांगितल्यानुसार विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना अशा काही वागणुकीला सामोरे जावे लागले, त्यामुळे अडीच वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना वाढीस लागली. त्यामुळे शिवसेनेचे ३५ आमदार आणि अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत गुजरात आणि नंतर गुवाहाटी येथे आश्रय घेतला. हे थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील बंड आहे.

(हेही वाचा शिवसेनेच्या संकटकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वार्थी कारभार! अध्यादेशांचा ‘पाऊस’ मुसळधार)

खरेतर याआधीही शिवसेनेत अनेकदा बंडाळी झाली होती. ज्यामध्ये १९७४ मध्ये बंडू शिंगरे यांचे सर्वात पहिले बंड होते. त्यानंतर १९९१ मध्ये छगन भुजबळ, २००५ मध्ये नवी मुंबईचे गणेश नाईक, २००५ मध्ये नारायण राणे आणि २००५ मध्ये राज ठाकरे वेगळे झाले होते. वर्तमानस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडाचे निशाण हाती घेतलेल्या या बंडखोर आमदारांना शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा हाती घ्यावा, अशी अपेक्षा आहे. ज्याकरता शिवसेनेला दोन्ही काँग्रेसची साथ सोडणे क्रमप्राप्त आहे.

एनटी रामाराव हे त्यांच्याच पक्षातून बाहेर पडले 

चंद्राबाबू नायडू यांचे सासरे आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) संस्थापक नंदामुरी तारका रामाराव हे 70 वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे 38 वर्षीय लक्ष्मी पार्वती यांच्याशी लग्न झाले होते. ही गोष्ट त्यांच्या 7 मुलगे आणि 3 मुलींना आवडली नाही. जेव्हा एनटीआरला अर्धांगवायू झाला तेव्हा ते आपल्या पत्नीवर अवलंबून राहिले. अशा परिस्थितीत ‘टेकळी’ ही पारंपरिक जागा रिकामी झाली होती, जिथून लक्ष्मी पार्वतीला निवडणूक लढवायची होती, रामाराव यांचे पुत्र हरिकृष्ण यांनीही या जागेवर दावा केला होता. येथूनच कुटुंबातील वाद उघड होऊ लागला. अखेरीस एनटीआरने तिसऱ्यालाच उभे करून या वादावर तात्पुरता विराम दिला. मात्र लक्ष्मीने पक्षात ढवळाढवळ सुरू करताच तिला ‘अम्मा’ म्हणणारे पक्षाचे आमदार-खासदारही तिच्या विरोधात उभे ठाकले. एकीकडे रामाराव नेहमी पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्या पाठीशी उभे राहिले, तर त्यांचा मुलगा, मुलगी आणि जावई यांनी बंड केले. या बंडाचे नेतृत्व चंद्राबाबू नायडू यांनी केले होते, जे त्यावेळी रामाराव सरकारमध्ये मंत्री होते. एनटी रामाराव, ज्यांनी टीडीपीची निर्मिती केली, त्या रामाराव यांची चंद्राबाबू नायडू यांनी सरकारच्या प्रमुखपदावरून केवळ हकालपट्टीच केली नाही, तर त्यांची पक्षातूनही हकालपट्टी केली. अखेरीस एन.टी. रामाराव यांनी त्यांच्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध जाहीरपणे तोडले आणि चंद्राबाबू नायडू यांना “पाठीवर वार करणारा कपटी” आणि “औरंगजेब” म्हणायला सुरुवात केली.

चंद्राबाबूंनी सासरे हरिकृष्ण यांनाही बाजूला केले

2011 मध्ये तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक एनटी रामाराव यांचा मुलगा नंदामुरी हरिकृष्ण आणि त्यांचे जावई आणि पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यात राजकीय वारसदार बनण्यासाठी चढाओढ लागली होती. एनटी रामाराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांनी त्यांचा मुलगा लोकेश नायडू यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला, तर एनटी रामाराव यांचे ज्येष्ठ पुत्र नंदामुरी हरिकृष्ण यांनी याला कडाडून विरोध केला. टीडीपीचे पॉलिटब्युरो सदस्य हरिकृष्ण यांना त्यांचा मुलगा ज्युनियर एनटीआरने पक्षाची सूत्रे हाती घ्यावी, अशी इच्छा होती. मात्र तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी हे मान्य केले नाही. यानंतर एनटीआर कुटुंबात पुन्हा एकदा बंडखोरी झाली. यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाला पूर्णपणे ताब्यात घेतले.

(हेही वाचा तेव्हाच शिवसेना होणार एकनाथ शिंदेंची!)

करुणानिधींनी द्रमुकवर कब्जा केला

एमजी रामचंद्रन 1953 पर्यंत काँग्रेसमध्ये राहिले आणि 1953 मध्ये करुणानिधींच्या मदतीने द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) मध्ये सामील झाले. अभिनेता आणि नेत्याची प्रतिमा राज्यात दिवसेंदिवस यशाची शिडी चढत होती. दरम्यान एमजी रामचंद्रन (एमजीआर) यांची पक्षात उंची वाढत होती. त्यामुळे करुणानिधींना अडचणी येऊ लागल्या. द्रमुकचे संस्थापक अण्णा दुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी आणि एमजीआर यांच्यातील कटुता चव्हाट्यावर आली होती. या कटुतेच्या काळात, 1972 मध्ये, करुणानिधींनी त्यांचा मुलगा एमके मुथूला राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित केले. तर दुसरीकडे एमजी रामचंद्रन यांनी त्यांच्या सह-अभिनेत्री जयललिता यांना पुढे केले. यामुळे संबंध बिघडले आणि एम. करुणानिधी यांनी एमजीआर यांची पक्षातून हकालपट्टी केली.

एमजीआरच्या पत्नीला जयललिता यांनी हाकलून दिले

1972 मध्ये MGR यांनी AIADMK ची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये पक्षाला चांगला पाठिंबा मिळाला आणि एमजीआर 1977 ते 1987 पर्यंत मुख्यमंत्री होते. दरम्यान, एमजीआर यांच्या पत्नी जयललिता यांच्या पक्षातील वाढत्या महत्वावर नाराज होत्या. परिणामी 1985 मध्ये एमजीआरच्या पत्नी जानकी यांनी एमजीआरचे जवळचे सहकारी थिरुनावुकारासू यांच्या मदतीने जयललिता यांची पक्षातून हकालपट्टी केली. AIADMK दोन गटात विभागला. जयललिता यांचा गट मजबूत होता, त्यामुळे एमजीआरच्या मृत्यूनंतर त्यांनी अण्णा द्रमुकचा ताबा घेतला.

(हेही वाचा मागच्या अडीच वर्षांत आमदारांना अपमानास्पद वागणूक; बंडखोर आमदाराचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.