मंगळवार, २८ जून रोजी माझ्या पक्षाची अलिबाग येथे सभा होणार आहे. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार नाही. त्यानंतरही माझ्या सभा होणार आहेत. तसेच सध्या शिवसेनेच्या पक्षातील घडामोडी घडत आहे. त्यामुळे मी ईडीकडे वेळा मागून घेणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काय म्हणाले संजय राऊत?
ईडीने मला समन्स बजावले आहे. त्यात ज्या तीन कंपन्यांचा उल्लेख केला आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. शिवसेनेचा बाणा आणि महाराष्ट्राची इभ्रत राखण्यासाठी आमचा हा लढा सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचावण्यासाठी मला रोखण्यासाठी माझ्याविरोधात खोटे खटले दाखल केले जात असले, तरीही मी गुवाहाटीच्या मार्ग धरणार नाही. माझी मान कापली तरी चालेले. बाळासाहेबांचा मी शिवसैनिक आहे. मंगळवारी, २८ जून रोजी मी ईडीच्या कार्यालयात जाणार नाही. कारण अलिबाग येथे माझी सभा आहे. ही कायदेशाची लढाई आहे. त्यासाठी मला वेळ लागेल. त्याही उपर मला जर अटक करण्याचा आदेश दिल्लीने दिला तर मला खुशाल घेऊन जाऊ शकतात. गुवाहाटीला बसलेल्या बंडखोरांच्या बैठकीत माझ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. मला आधीच माझ्यावर ईडीची कारवाई होईल, याची कल्पना आली होती. शिवसेनेला रोखण्यासाठी काही लोक एकत्र येतील आणि मला व माझ्या सहकार्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील, हे मला माहीत होते. मी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. उद्या माझी अलिबागमध्ये सभा आहे पुढेही सभा आहे, त्यामुळे मी ईडीकडे वेळ मागून घेईन, पण मी पळून जाणार नाही, असेही राऊत पुन्हा म्हणाले. सध्या सर्वोच्च न्यायालयात जे चालले आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही त्यासाठी शिवसेनेचे कायदेशीर पथक दिल्लीत आहे. ते त्यावर बोलतील, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा ‘या…मला अटक करा!’ ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी केले ट्वीट)
Join Our WhatsApp Community