काका-पुतण्यात विसंवाद! बोलण्याआधी निदान एकत्र चर्चा करा! मुनगंटीवारांचे शरद पवारांवर टीकास्त्र 

116
सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडामागे भाजप आहे असे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे अप्रत्यक्ष म्हणाले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी वक्तव्य केले, हा काका आणि पुतण्या यांच्यातील विसंवाद आहे, अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला याविषयी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले शरद पवार आणि अजित पवार? 

गुरुवारी, २३ जून रोजी सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीबाबत एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आणि खासदार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर उपमुख्यंमत्री अजित पवार हे पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ आमदारांनी केलेल्या बंडामागे भाजप असल्याचे दिसत नाही, बंडखोर आमदारांची सोय करण्यामध्ये भाजपचा कोणताही मोठा नेता दिसत नाही, असे वक्तव्य केले. त्यानंतर लगेचच एनसीपी अध्यक्ष शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बंडखोरीला राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. देशात केवळ सहा राष्ट्रीय पक्ष आहे, यापैकी कोण पक्ष आहे हे ओळखा. अजित पवार जर या बंडामागे भाजप असल्याचे दिसत नाही असे म्हणत असतील तर अजित पवार यांचा आसाममध्ये जास्त परिचय नाही. त्यामुळे त्यांना यातील काही माहित नाही, आम्हाला तेथील सगळी माहिती आहे, असे म्हटले.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? 

यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हे म्हणजे काका-पुतण्यामधील विसंवादच म्हणावा लागेल. एका बाजूला काका अर्थात शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदेच्या बंडामागे भाजप आहे, तर दुसरीकडे पुतण्या अर्थात अजित पवार म्हणतात भाजप या बंडामागे दिसत नाही, त्यामुळे निदान काका-पुतण्या यांनी एकत्र बसून चहा पित चर्चा करून काय बोलायचे हे तरी ठरवावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.