विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३५ आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा सल्ला दिल्याचे पुढे आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. या भेटीआधी दोन्ही नेत्यांचे फोनवरून संवाद साधला. या संवादात सरकार वाचवायचे असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकार वाचवण्यासाठी पवारांचा सल्ला
सरकार अल्पमतात असल्याने पवारांनी हा सल्ला दिला आहे. शिंदे गटाचा पाठिंबा घेऊन भाजपा पडद्यामागून सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. जर माझे मुख्यमंत्रिपद नको असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागेल. सत्तास्थापने वेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावले. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह! बंडखोर आमदारांशी केलेला असफल संवाद! )
Join Our WhatsApp Community