शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली मात्र सत्ता दोन्ही काँग्रेससोबत स्थापन केली तेव्हा भाजप रस्त्यावर उतरला नव्हता, मग तुम्हीही हे खेळाडूवृत्तीने का घेत नाही?, असेही आमदार केसरकर म्हणाले. संजय राऊत यांची भाषा ही कायम भडकावू असते, त्यांची तशी बोलायची पद्धत आहे, आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. जर पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत आम्हाला जात बाळासाहेबांचे नाव वापरात येणार नाही, असे सांगत असतील तर आम्ही शिवसेना हेच नाव वापरू, शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर म्हणाले. शिंदे गटाची भूमिका मांडण्यासाठी झूम वर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
गुवाहटीला येण्याआधी उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडलेली
आम्हाला आजही पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी आदर आहे. त्यांच्याविषयी आम्ही काहीही आरोप करू शकत नाही. मात्र त्यांनी आमची व्यथा समजून घ्यावी आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा आमच्या म्हणण्याला समर्थन द्यावे, आमच्याकडे आता दोन तृतीयांश बहुमत आहे. जरी विधानसभा उपाध्यक्षांनी आमच्या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला कायदेशीर आधार नाही, उपाध्यक्ष झिरवळ यांच्या विरोधात आम्ही अविश्वासाचा प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव झिरवळ स्वतः फेटाळून कसे लावू शकतात? आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव येण्याआधी त्यांच्यावरील अविश्वासाचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्यानंतरच्या प्रस्तावाचा त्यांनी विचार का केला?, आम्ही आमची ओळख परेड राज्यपालांच्या समोर करू, तसेच उपाध्यक्षांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देवू, असेही दीपक केसरकर म्हणाले. मी आणि काही आमदार गुवाहटी येण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आम्ही आमची भूमिका मांडली आणि महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याची विनंती केली, जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच विचाराचे असतील त्या राज्याचा विकास होतो, मात्र त्याची दखल घेतली नाही, असेही केसरकर म्हणाले.
(हेही वाचा महाराष्ट्रात कधी परतणार? एकनाथ शिंदे गटाने काय दिले उत्तर?)
Join Our WhatsApp Community